Breaking News

महाबळेश्वरच्या कॅम्पसमधून निसटलेले दोन विद्यार्थी पोलादपूरमधून ताब्यात

पोलादपूर : प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील एका हायस्कूलच्या कॅम्पसमधून निसटलेली दोन मुले सोमवारी (दि. 11) पहाटे पोलादपूर पोलिसांना शहरामध्ये संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. त्यांची आस्थापूर्वक माहिती घेऊन या दोन्हीही मुलांना पुन्हा कॅम्पस अधीक्षकांच्या ताब्यात देऊन पोलादपूर पोलिसांनी कर्तव्य बजावले. पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावरील गाडीतळ ते बँक ऑफ इंडिया कॉर्नर या रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना दोन शाळकरी मुले पायी फिरताना आढळली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने पोलादपूर बिट मार्शलने यांची आस्थापूर्वक चौकशी केली. त्यात हे दोघे विद्यार्थी महाबळेश्वर येथील अंजूमन उर्दू हायस्कूल कॅम्पसमधून अज्ञात वाहनाने कोणासही कोणतीही पूर्वकल्पना न देता निसटले असल्याचे समजून आले. हेडकॉन्स्टेबल व्ही. जी. चव्हाण यांनी दोघांना पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली असता यापैकी एकाचे नाव अब्दुल महमूद शेख, तर दुसर्‍याचे नाव रहमतल्ला शेख आणि दोघांचे वय सात वर्षे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी त्यांच्या हायस्कूलच्या प्राचार्यांना या मुलांची माहिती दिली आणि पोलादपूर येथे बोलावून घेतले. महाबळेश्वर येथील अंजूमन उर्दू हायस्कूल कॅम्पसचे अधीक्षक इम्रान इकबाल अहमद शेख पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन ते पुन्हा कॅम्पसमध्ये रवाना झाले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply