पेण : प्रतिनिधी
येथील जलतरणपटू स्वराली म्हात्रे हिने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किमीचे सागरी अंतर 12 तास व 31 मिनिटांत पोहून नुकतेच पार केले. याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
स्वराली म्हात्रे हिने 3 मार्च रोजी पहाटे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात केली आणि ते ते यशस्वीपणे पूर्ण केले. या वेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना व पेण तालुका हौशी जलतरण संघटनेचे प्रशिक्षक हिमांशु मलबारी, सचिन शिंगरूट, अनिल कणघरे, ओपन वॉटरसी स्विमिंगचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील, निरीक्षक नील लब्धे, बाळकृष्ण म्हात्रे, जयश्री म्हात्रे, अध्यक्ष पी. एम. म्हात्रे आदी उपस्थित होते. स्वराली म्हात्रे ही पेण प्रायव्हेट हायस्कूल अॅण्ड जुनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत असून, या साहसाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.