Breaking News

सायकलिंगमध्ये श्रेयसीला रौप्यपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त

सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने वाशिम जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या वतीने दुसरी राज्यस्तरीय रोड सायकलिंग स्पर्धा नुकतीच वाशिममधील विठ्ठलवाडी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नवीन पनवेल येथील श्रेयसी कांचन कोठेकर हिने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्रातील जिल्हा संघांचा समावेश होता. स्पर्धा मास स्टार्ट व टाईम ट्रायल या प्रकारात मुले व मुली या विभागात विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली. मुलींच्या सबज्युनियर 16 वर्षांखालील टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात श्रेयसी कोठेकर हिने रौप्यपदक जिंकले. तिने रायगड जिल्ह्यातील एकमेव पदकाची कमाई केली.

Check Also

उरणच्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा

नागरी प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांचे अधिकार्‍यांना निर्देश उरण ः वार्ताहरउरण पंचायत समितीची आमसभा शुक्रवारी …

Leave a Reply