पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील तलवारपटू निमिषा थवई हिने सन 2019-20 या वर्षात महाराष्ट्र राज्य, तसेच राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आपली चुणूक दाखवली. त्याबद्दल तिची खेलो इंडिया योजनेंतर्गत पटियाला येथील राष्ट्रीय खेळ प्रशिक्षण अकादमीत पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्याबद्दल निमिषाचे कौतुक होत आहे.
निमिषा या अवघ्या 13 वर्षांच्या चिमुरडीने जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र सबज्युनिअर स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक कांस्यपदकावर नाव कोरले आहे, तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना छत्तीसगढ येथील सबज्युनिअर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत तिने संघास कांस्यपदक मिळवून दिले व देशात वैयक्तिक सहावा क्रमांक मिळविला. लातूर येथे झालेल्या राज्यस्तर शालेय तलवारबाजी स्पर्धेत सांघिक सुवर्ण व वैयक्तिक कांस्यपदक मिळवून पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश केला, तर फेब्रुवारी 2020मध्ये गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत निमिषाने पुन्हा एकदा आपल्या अंगी असलेले कौशल्य दाखवून महाराष्ट्रास सांघिक कांस्यपदक मिळवून दिले.
या कामगिरीच्या जोरावर निमिषाची केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेंतर्गत राष्ट्रीय खेळ प्रशिक्षण अकादमीत पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे, पालकांचे, तसेच प्रशिक्षक मिलिंद ठाकूर यांचे अभिनंदन होत आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …