Breaking News

धूलिवंदन सणानिमित्त रंग, पाण्याची उधळण टाळा

माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

कोरोना व्हायरस संदर्भातील जागतिक संकट लक्षात घेता व भारतात सुध्दा काही ठिकाणी कोरोना व्हायरसचे संशयीत रुग्ण आढळल्याचे पाहता याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी (धूलिवंदन) सण साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. आपणही या गोष्टीची काळजी घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रात धूलिवंदन सणानिमित्त होणारे नागरिकांचे एकत्रीकरण व एकमेकांवर केली जाणारी रंग व पाणी याची उधळण शक्य असल्यास टाळावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. तशी मागणी त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुध्दा लेखी पत्राद्वारे केली आहे व आयुक्तांनी ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना धूलिवंदन सणानिमित्त रंग व पाण्याची उधळण टाळण्याचे आवाहन करावे अशी विनंती विक्रांत पाटील यांनी केलेली आहे. या विषयी माहिती देताना विक्रांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसने संपूर्णने जगात थैमान घातलेले आहे. अशावेळी आपण घाबरून न जाता सावधपणे पावले उचलण्याची गरज आहे व त्यासाठी आपण स्वत:ची, आपल्या कुटुंबाची तर काळजी घेतलीच पाहिजे पण त्याव्यतिरिक्त सामाजिक भान ठेवून समाजात काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर इतरांना सावध करुण या संकटापासून आपल्या परिसरचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी विक्रांत पाटील यांनी स्वत: बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने जनजागृती करणारी पत्रके घरोघरी पाठवली असून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply