Breaking News

बंडू खंडागळे यांची भाजप जिल्हा चिटणीसपदी फेरनियुक्ती

पेण : प्रतिनिधी

भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस पदावर बंडू  खंडागळे यांची फेरनियुक्ती झाल्याने पेण शहर व तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी बंडू खंडागळे यांचे अभिनंदन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी 9 नोव्हेंबर 2016 रोजी बंडू खंडागळे यांची जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांना माणगाव आणि सुधागड तालुका संपर्क प्रमुख तसेच खोपोली मंडल निवडणूक प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली होती. दक्षिण  रायगडचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी बंडू खंडागळे यांची शुक्रवारी (दि. 6) पुन्हा दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा चिटणीसपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर बंडू खंडागळे  यांनी आमदार रविशेठ पाटील यांची पेण येथील वैकुंठ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आमदार रविशेठ पाटील यांनी खंडागळे   यांच्या संघटनेतील कामाची प्रशंसा करून, यापुढेही भाजपची  संघटनात्मक कामे ताकदीने करा, मी सदैव तुमच्या पाठीशी राहील, असे सांगून खंडागळे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे पेण तालूका अध्यक्ष श्रीकांत पाटील व शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी उपस्थित होते. पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील तसेच गुरव समाज मित्रमंडळातर्फे बंडू खंडागळे यांचे जिल्हा चिटणीस पदी फेरनियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply