Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पतंजली योगपीठ पनवेल शाखेतील योग शिक्षकांनी उपस्थित प्राध्यापक व कर्मचार्‍यांना प्रात्यशिकासह मार्गदर्शन केले.

भारतीय संस्कृतीने योग ही जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. त्याचा फायदा सर्वांनी करून घेतला पाहिजे, असे या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी यांनी सांगितले. योग व प्राणायाम यांच्या आधारे शारिरिक व मानसिक आजार दुर ठेवणे शक्य आहे, असे योगशिक्षिका युक्ती प्रभारी अपर्णा महेश धायगुडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात पतंजली योगपीठच्या योगशिक्षिका छाया दिलीप जगताप (पनवेल जिल्हा प्रभारी), रूतिका रवींद्र मोरे (कोषाध्यक्ष पनवेल) व कमळ राधेशाम महाजन (नहाविक प्रभारी कामोठे, पनवेल) यांनी कपालभाती, भामरी, व्रजासन, सुर्यनमस्कार, मुद्रा अशी विविध आसने उपस्थितांकडून व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पदधतीने करून घेतली.

या वेळी माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या दुर्गा मौर्या, प्राध्यापक व कर्मचारी यासह 40 जणांचा सहभाग होता. सुत्रसंचालन प्रा. रोहित पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. नमिता सिन्हा यांनी मानले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply