Breaking News

पहिली महिला बुद्धिबळ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष तसेच जागतिक महिलादिनानिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालयात पनवेल चेस असोसियशन आयोजित रायगडमधील पहिली खुली महिला बुद्धिबळ स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी ठाणे, नवी मुंबई, कर्जत, खोपोली, पाली, अलिबाग येथील 42 महिला व 25 मुलींनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेचे उद्घाटन ब्रम्हकुमारी डॉ. शुभदा नील यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगराध्यक्षा तथा माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजकांचे कौतुक केले.

स्पर्धेसाठी प्राचार्या डॉ. रमा भोसले, सिने अभिनेत्री साक्षी  परांजपे, रायगड जिल्हा विधी व न्याय सल्लागार अ‍ॅड. गीता दर्शन म्हात्रे, मीना बन्सल, सचिव पुष्प निकेतन इंग्लिश स्कूल पाले बुद्रुक, पनवेल चेस असोसिएशनचे अध्यक्ष गंभीर दांडेकर आदी उपस्थित होते. अध्यापक महाविद्यालयाच्या प्रज्वली नाईक यांनी सूत्रसंचालन तर अंकिता वाघमारे व रूपाली चव्हाण यांनी स्वागतगीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.

स्पर्धेत आठ वर्षापासून 72 वर्षीय वीणा गोखले सारख्या वयोवृद्ध महिलांनी स्पर्धेचा आनंद लुटला. स्पर्धेसाठी प्रमुख पंच मंगला बिराजदार, सी.एन. पाटील, डॉ. प्रितम म्हात्रे, अमित कदम, स्वप्नील ठिक, अंकित जोशी, श्रेयस पाटील  यांनी काम पाहिले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभास प्राचार्या डॉ. रमा भोसले, पत्रकार मिलिंद खारपाटील, सोसायटी फॉर सोशल इनोवेशन अ‍ॅण्ड डेव्होलोपमेंट-पुणेच्या उपाध्यक्षा मंगला बिराजदार तसेच चतुरंग निर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, क्रीडशिक्षक नीलिमा मोरे, कर्णबधिर शाळेच्या कुंदा शेवाळे उपस्थित होत्या. स्पर्धा दोन गटात 15 वर्षावरील महिला /15 वर्षाखालील  मुली अशी खेळविण्यात आली. प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिके तसेच सर्वांना सहभागी प्रमाणपत्र

देण्यात आली.

पारितोषिक पात्र : महिला गट – 1) गायत्री गोखले, 2) रंजना शिर्के, 3) सुगंधा पाटील, 4) श्रेया पाटील, 5) अक्षदा रवींद्र डुचे, 6) रेखा देशमुख, 7) सिद्धी मोहिते, 8) दिप्ती चाचले, 9) शुभांगी साळुंखे, 10)सुनीता पाधी. 15 वर्षावरील गुली गट – 1) पल्लवी यादव, 2) नमोम पाधी 3) जान्हवी तुपे, 4) ज्ञानदा गुजराथी, 5) इनी शेट्टी, 6) गार्गी हिंगणे, 7) कस्तुरी कनगुटकर, 8) राजश्री पुहान, 9) वृषाली सांगळे, 10) श्रेयसी चक्रवर्ती

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply