Breaking News

कामोठे येथे महिलांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा कामोठे तालुका मंडळ यांच्या वतीने महिला आरोग्यविषयक विशेष व्याख्यान आणि विविध खेळांचे आयोजन रविवारी (दि. 8) करण्यात आले होते. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात डॉ. महेकाशान पटेल यांचे महिला आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले. तसेच महिलांसाठी पाक कला, उखाणे, आणि विविध खेळ घेण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, पुष्पा कुत्तरवडे, तालुका महिला मोर्चा सरचिटणीस लीना पाटील, कामोठे महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, उपाध्यक्षा साधना आचार्य, रश्मी भारद्वाज, सरचिटणीस स्वाती केंद्रे, जयश्री धापते यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply