Breaking News

पनवेल तालुक्यात 299 नवे कोरोनाबाधित

चार जणांचा मृत्यू    299 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि.25) कोरोनाचे 299 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 299 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 233 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 238 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 66 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 61 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 3, एच 25 एलआयजी-1, नवीन पनवेल सेक्टर 4 पुष्प मंदिर अपार्टमेंट, खांदा कॉलनी सेक्टर 1 वर्षा सोसायटी आणि कामोठे सेक्टर 34 रवी रचना सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 16  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2877 झाली आहे. कामोठेमध्ये 66 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3894 झाली आहे. खारघरमध्ये 61 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3713 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 62 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3292 झाली आहे. पनवेलमध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 3147  झाली आहे. तळोजामध्ये सहा नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 733 झाली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 17656 रुग्ण झाले असून 15143 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.77 टक्के आहे. 2114 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 399 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 5585 झाली असून 4837 जणांनी कोरोनावर मात केली असून 96 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत 397 जण बाधित

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत 397 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईत बधितांची संख्या 34 हजार 896 तर 337 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 30 हजार 620 झाली आहे. दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 725 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांत बेलापूर 67, नेरुळ 59, वाशी 59, तुर्भे 34, कोपरखैरणे 73, घणसोली 44, ऐरोली 55, दिघा सहा जणांचा समावेश आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply