मोहोपाडा ः प्रतिनिधी
चक्रीवादळामुळे रसायनीतील चांभार्ली बसथांब्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील निवारा शेड उडून गेले होेते. मुसळधार पावसात चांभार्ली शिवस्मारकाला निवारा शेड नसल्याने या स्मारकाची बिकट अवस्था झाली होती, मात्र दोन महिने होऊनही शिवस्मारकाकडे कोणीही लक्ष न दिल्याने एक सामाजिक संदेश म्हणून एक हात समाजसेवेसाठी या सामाजिक उपक्रमासाठी रसायनीतील युवकांनी शिवभक्त असल्याचा अभिमान बाळगत चांभार्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील निवारा शेड नवीन करून व सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण तसेच रंगरंगोटी करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याकरिता रसायनीतील केदार शिंदे, अजित पाटील, पंकज जाधव, नरेंद्र पाटील, रोशन ठोंबरे, जगदिश कोंडीलकर, सुशांत पाटील, ऋतिक पाटील, शुभम बाबर, प्रथमेश गायकवाड, लखन, निशांत आदींचे सहकार्य लाभले.