Breaking News

भालाफेकपटू शिवपाल सिंह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्रानंतर टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलेला शिवपाल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी 85 मीटरचे अंतर पार करण्याची अट होती. शिवपालने 85.47 मी. लांब भाला फेकत टोकियोचे तिकीट मिळवले.
साबळेलाही तिकीट
शिवपाल सिंहव्यतिरिक्त 20 किमी चालण्याच्या शर्यतीत के. टी. इरफान आणि तीन हजार मि. स्टिपलचेस 4 * 400 रिले या दोन प्रकारात महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply