Breaking News

वाशीच्या कॉलेजमध्ये कर्मवीर अण्णांना अभिवादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134वी जयंत्ती बुधवारी (दि. 22) साजरी झाली. जयंत्तीनिमित्त ‘रयत’च्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना काळात संस्थेने केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. ‘रयत’चे अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्यांनी अफाट काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी ‘रयत’ने सन 2020-21 पासून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचे यंदाचे मानकरी समाजसेवक कैलासवासी गणपतराव देशमुख व झाहिरबाई सोमा कोकले हे ठरले. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रुपये दोन लाख 50 हजार व मानपत्र असे आहे. हे पुरस्कार 9 मे 2022 रोजी सातारा येथे कर्मवीरांच्या  पुण्यतिथीच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाचे झूम या प्रसारमाध्यमाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्रतिभा गायकवाड, नगरसेवक दशरथ भगत, माजी उपमहापौर अविनाश लाड, अ‍ॅड. पी. सी. पाटील, प्राचार्या शुभदा नायक, सर्व विभागांचे उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply