Breaking News

राज्यसभा उमेदवारीवरून शिवसेनेत धुसफूस

चतुर्वेदी यांना तिकीट दिल्याने खैरे नाराज

मुंबई : प्रतिनिधी
काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेल्याने सेनेत धुसफूस सुरू झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, खैरे यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
येत्या 26 मार्चला राज्यसभेची निवडणूक होत आहे. यासाठी शिवसेनेकडून खैरे आणि रावते यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक आणि एमआयएमच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खैरेंना शिवसेना राज्यसभेत पाठवेल, असे बोलले जात होते, मात्र शिवसेनेने खैरे आणि रावते यांचा पत्ता कट केल्याने नाराजी पसरली आहे. राज्यसभेच्या या एका जागेसाठी रावते, खैरेंपाठोपाठ शिवाजीराव पाटील आणि अनंत गीते यांचीही नावे चर्चेत होती, मात्र या सर्वांना डावलून शिवसेनेने चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे.
चतुर्वेदी या काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या आहेत. त्यांना तिकीट दिल्याने खैरे नाराज झाले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply