
पनवेल : शहर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी रोहित जगताप यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जगताप यांचे गुरुवारी अभिनंदन केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, माजी युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, अजित सिंग, यश जुवेकर, रोहित पवार, कुणाल शर्मा आदी उपस्थित होते.