Breaking News

पळस्पे उपसरपंच अजय तेजे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त

तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अजय अशोक तेजे यांची शुक्रवारी (दि. 13) बिनविरोध निवड झाली. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. उपसरपंचपदाच्या निवडीवेळी सरपंच चंद्रकांत भोईर, भाजप पळस्पे विभायीय अध्यक्ष अनेश ढवळे, सदस्य दिनेश बेडेकर, अरुणा भोईर, सपना वारके, नीता भगत, रेखा दामोदरे, विजय गवंडी, ग्रामसेवक रा. बा. दासगावकर, सुकापूरचे माजी सरपंच पांडुरंग केणी, माजी सदस्य संगीता केळकर, सुप्रिया तेजे, सज्जन वारके, प्रशांत भगत, बाळकृष्ण भोईर, युवा नेते भूषण कामरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते जगदिश दामोदरे, हर्षल तेजे आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, युवा नेते योगेश लहाने यांनी तेजे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply