Breaking News

बटलरचे यशस्वीला खास गिफ्ट

मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएलचा 14वा हंगाम बीसीसीआयने स्थगित केल्यानंतर सर्व विदेशी खेळाडू मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे हे खेळाडू संघातील आपल्या इतर सहकार्‍यांना भेटून घरी जात आहेत. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आपला युवा सलामीवीर साथीदार यशस्वी जयस्वाल याला एक खास भेट दिली आहे. बटलरने यशस्वीला एक बॅट दिली आहे.
या बॅटद्वारे बटलरने यशस्वीला एक खास संदेश दिला. तुझ्या गुणवत्तेचा आनंद घे, माझ्या तुला शुभेच्छा, असे बटलरने या बॅटवर आपली स्वाक्षरी देत म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सने या दोघांचा बॅटसह फोटो आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. कोरोनामुळे आयपीएल 2021 पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यांनाही कोरोनाची लागण झाली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply