Breaking News

पोलीस मित्र संघटनेकडून कोरोनाबद्दल जनजागृती

कर्जत ः बातमीदार

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने चिंचवली-डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात कोरोना विषाणूबद्दल जनजागृती मोहीम घेण्यात आली. पोलीस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत आवाहन करणारी पत्रके काढून आवाहन केले आहे. पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे व जिल्हा सचिव सुप्रेश साळोखे तसेच कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब राऊत विद्यालयात जाऊन प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यात पोलीस मित्र संघटनेच्या वतीने कोरोना विषाणूबद्दल माहिती देणारी पत्रके तयार केली आहेत. कार्यकर्त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची याबद्दल माहिती दिली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply