पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष आणि उलवे नोड 2 महिला मोर्चा कमिटीतर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (दि. 21) झाला या समारंभाचे भाजप नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससमोर झालेल्या हळदीकुंकू समारंभास या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माजी सरपंच हौसाबाई कोळी, न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंजुषा ठाकूर, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, लीना पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य गिरीजाबाई कातकरी, उलवे नोड 2 अध्यक्ष योगिता भगत, उपाध्यक्ष सुजाता पाटील, कामिनी कोळी, मिना म्हात्रे, चिटणीस उषा देशमुख, रंजना पाटील, सुमन पाटील, शुभांगी पाटील, सिना वर्गिस, अर्चना मिश्रा, अनुसया घरत, नंदा ठाकूर, जयश्री देशमुख, अनिता ठाकूर, यमुनाबाई पाटील, इंद्रायणी कोळी, शोभा ठाकूर, कमलाबाई म्हात्रे, संगीता कोळी, संगीता म्हात्रे, धनवंती पाटील, इंदूमती म्हात्रे, आशा म्हात्रे, स्नेहलता ठाकूर, देवकीबाई ठाकूर, मनीषा घरत, शांताबाई ठाकूर, बानूबाई भगत, जयश्री कोळी, राधाबाई ठाकूर, सीमा भगत, राधा ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या समारंभात महिलांसाठी खेळ पैठणीचा, लकी ड्रॉ तसेच विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper