Breaking News

सॅनिटायझर, मास्क वाजवी दरात विकून नागरिकांना सहकार्य करा!

पनवेल भाजप युवा मोर्चाचे मेडिकल दुकानदारांना आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही जण सॅनिटायझर व मास्क चढ्या दराने विकत आहेत, परंतु कोरोनाचे अरिष्ट लक्षात घेऊन आरोग्यविषयक या वस्तूंची वाजवी दरात विक्री करावी, असे आवाहन पनवेल भाजप युवा मोर्चाच्या वतीने मेडिकल दुकानदारांना करण्यात आले आहे. यासंदर्भात युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी भाजप उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नियोजनाखाली मोहीम राबवित पत्रक वाटप केले. या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूबद्दल अनेक समज-गैरसमज पसरत आहेत. शासनाने योग्य ती पावले उचलली असली तरी अजून समाजातील बराच घटक सॅनिटायझर आणि मास्क या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. आज अनेक ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्क हे विक्रेते महाग दराने विकताना दिसत आहेत. या भीषण रोगाचा सामना करण्यासाठी आपण या मूलभूत गोष्टींची विक्री योग्य आणि सवलतीच्या दरात करून सर्वसामान्य जनतेस दिलासा देणे अपेक्षित आहे, तसेच कोणीही या परिस्थितीचा गैरफायदा घेत असेल तर सक्षम प्राधीकरणाकडे त्या विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी आमच्यामार्फत जनहितासाठी मागणी केली जाईल. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सारे एकत्र येवून लढायची गरज आहे. आपण आम्हाला योग्य ते सहकार्य करावे. या मोहिमेत युवा नेते चिन्मय समेळ, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह प्रथमेश भगत, शुभम बिराजदार, यश जुवेकर, जतीन दोशी, रवी संदेपाल, कुणाल शर्मा, मिहिर हिंगू, कुशाल शहा, विनय जोशी, मीत जोशी, विक्रांत कुंभार, दीपक महाजन आदी सहभागी झाले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply