पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या संसर्गाबद्दल रुग्णांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. कोरोनाच्या संदर्भात रुग्णामध्ये वाढत्या अफवांवर लगाम घालण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निवडक डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकतीच बैठक घेतली. कोरोना या आजाराबद्दल सध्याच्या घडीला नागरिकांमध्ये गैरसमज आहे. त्याचा फैलाव लागण याबाबत सर्वानीच सतर्क राहणे गरजेचे आहे. पालिका क्षेत्रात डॉक्टरांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. त्यांच्यामध्ये देखील कोरोना संदर्भात भीती निर्माण झाली आहे. अशा रुग्णांना कोरोनाबाबत जागृत करण्याच्या दृष्टीने या वेळी आयुक्त देशमुख यांनी उपस्थित डॉक्टरांना सूचना केल्या.
पोलिसांतर्फे विविध उपाययोजना
राज्यभरात करोना विषानूचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिका विविध उपायोजना करुन आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहे. तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ही विविध उपाययोजना करुन कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याबाबात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शत्रृघ्न माळी यांनी माहिती दिली.