Monday , February 6 2023

खारघरमध्ये महिलांच्या अंगावरील दागिने लुटले

पनवेल : वार्ताहर चेन स्नॅचिंग करणार्‍या लुटारूंच्या कारवाया नवी मुंबईत सुरूच असून या लुटारूंनी खारघरमध्ये दोन दिवसांत चार महिलांच्या अंगावरील दागिने लुटून नेले आहेत. या लुटारूंविरोधात खारघर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. चेन स्नॅचिंग करणार्‍या लुटारूंनी अशा महिलांवर पाळत ठेवून त्यांचे दागिने लुटले. या लुटारूंनी 8 मार्च रोजी खारघर सेक्टर-12मध्ये सायंकाळी सिंधू अशोक ननावरे (51) यांच्या गळ्यातील 20 हजारांची सोन्याची चेन लुटून नेली. त्यानंतर या लुटारूंनी प्रमिला सूर्यभानजी सांगोले (68) या  वृद्धेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून नेली. या घटनेनंतर लुटारूंनी खारघर सेक्टर-7मध्ये सुनीता शंकर बियाल (50) या महिलेच्या गळ्यातील 35 हजार रुपयांची सोन्याची चेन लुटून नेली. सुनीता बियाल ह्या सेक्टर-7मधील बँक ऑफ इंडिया ते नवरंग चौकापर्यंत चालत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या लुटारूने त्यांचे दागिने लुटून नेले. त्यानंतर सदर लुटारूने अवघ्या काही मिनिटांमध्ये  खारघर सेक्टर-21मधून पायी चालत जाणार्‍या विना मगनभाई मिस्री (71) या वृद्धेच्या गळ्यातील 35 हजारांचे दागिने लुटून नेले. खारघर पोलिसांनी या चारही गुन्ह्यांची नोंद करून लुटारूंचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply