लंडन : वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षाखेरीस लांबणीवर टाकण्यात यावी, पण इतक्या लवकर याबाबत निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, अशी मागणी जागतिक अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी केली. अनेक खेळाडूंनी आक्षेप घेतल्यामुळे विविध जागतिक संघटनांनी ऑलिम्पिक आयोजनाबाबत नकार दर्शवला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाख पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा आयोजित करण्याबाबत ठाम असले तरी सद्यस्थितीत स्पर्धा लांबणीवर टाकणे शक्य आहे, असे टोकियो ऑलिम्पिक समन्वयक आयोगाचे सदस्य सेबॅस्टियन को यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, आयओसी व अन्य संघटनांसोबत झालेल्या बैठकीत ऑलिम्पिक आयोजनाबाबतच चर्चा झाली. त्यामुळे स्पर्धा आयोजनाबाबत एकमत झाले, पण ती कधी याचा निर्णय मात्र घेण्यात आला नाही.
दरम्यान, अॅथेन्समध्ये बंद दाराआड झालेल्या कार्यक्रमात ग्रीसने ऑलिम्पिक ज्योत यजमान टोकियोकडे सुपूर्द केली. 1896मध्ये पहिले आधुनिक ऑलिम्पिक जेथे झाले, त्या पॅनाथेनाइक स्टेडियममध्ये पोलव्हॉल्टमधील सुवर्णपदक विजेती कॅथरिना स्टेफानिडीने ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. लेफ्टेरिस पेट्रोनियसने ज्योत घेऊन स्टेडियमला फेरी मारली. टोकियो ऑलिम्पिक प्रतिनिधी नाओको इमोटोकडे ज्योत सुपूर्द करण्यात आली. इमोटो ग्रीसमध्येच असल्यामुळे आयत्या वेळी त्याची नियुक्ती करण्यात आली.
कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य असले तरी ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीचे प्रमुख मॅट कॅरोल मात्र आपल्या खेळाडूंना टोकियोला पाठवण्यासाठी आशावादी आहेत. सध्या जागतिक आरोग्य आपत्ती असताना लोकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागताहेत. अनेक जण आजारी पडत आहेत. सर्व काही अनिश्चितता आहे, पण दिवसेंदिवस परिस्थिती सुधारत आहे हे स्वीकारावे लागेल, असे कॅरोल यांनी सांगितले.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …