Breaking News

मधुकर ठाकूर सर्वांना मदत करणारे नेते होते

सर्व पक्षांची शोकसभेत श्रद्धांजली

अलिबाग ः प्रतिनिधी

माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर म्हणजे दिलेला शब्द पाळणारा आणि आपली तत्वे जपणारा माणूस होता. त्याचप्रमाणे गरिबीची जाण असणारा, राजकीय मतभेद विसरून सर्वांना मदत करणारा नेता होता, अशा भावना अलिबाग येथे आयोेेजित करण्यात आलेल्या शाकसभेत सर्वपक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केल्या.

स्व. मधुकर ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अलिबाग पंचायत समिती व नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 22) पीएनपी नाट्यगृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी ठाकूर यांच्या कार्याविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश मगर, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, अपूर्वा ठाकूर, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी या वेळी श्रद्धांजली वाहिली. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, राजिपच्या माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, सदस्य भावना पाटील, अ‍ॅड. आस्वाद पाटील, चित्रा पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, नगरसेविका चित्रलेखा पाटील, गिरीश तुळपुळे, जितीन गोंधळी, हर्षल पाटील, प्रदीप नाईक, सुरेश पाटील, अनिल पाटील, नंदू मयेकर आदी या शोकसभेला उपस्थित होते.

कोणेतेही काम झालेच पाहिजे या मताचे आमचे वडील होते. यापुढेही त्यांचे कार्य पुढे सुरूच ठेवत गोरगरिबांना ठाकूर कुटुंबीयांतर्फे मदतीचा हात दिला जाईल, असे स्व. मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ पुत्र अ‍ॅड. प्रवीण ठाकूर  यांनी या वेळी सांगितले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply