Breaking News

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळले

कमलनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

भोपाळ : वृत्तसंस्था
काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट अखेर शुक्रवारी
(दि. 20) झाला. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आले आहे. बहुमत चाचणीची मागणी करीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते, मात्र पुरेसे संख्याबळ नसल्याने बहुमत चाचणीआधीच कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचं सरकार कोसळले.

मध्य प्रदेशातील जनतेचा आज विजय झालाय. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे, पण राज्यातील काँग्रेस सरकार त्यापासून भरकटले. पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते!
-ज्योतिरादित्य शिंदे, भाजप नेते

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply