सॅनिटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार महिला व बालकल्याण समिती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्त्रियांचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता जाणीव जागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 7) करण्यात आले होते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील नाट्यगृहात बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन मशीनचे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, डॉ. शुभदा नील व डॉ. संजीवणी गुणे या स्त्री रोग तज्ञांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेविका कुसूम पाटील, राजेश्री वावेकर, हर्षदा उपाध्याय, रुचिता लोंढे, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.