Breaking News

इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगसाठी बोली

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आणि गेल्वया तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या 15 ते 17 मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या संघांची अंतिम निवड आणि 180 खेळाडूंवर बोली लावण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस प्रसाद बाबू यांनी दिली.

एनकेएफने गेल्या दोन महिन्यात देशभरातील वेगवेगळ्या आठ केंद्रांवर मोठ्या प्रमाणात निवड चाचणी आयोजित केली होती. या चाचणीला कबड्डी खेळाडूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. त्या चाचणीतून दमदार आणि जोरदार अशा 180 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंवर घसघशीत रकमेची बोली लावून त्यांचा लिलाव पुढील तीन दिवस पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात केला जाईल. सर्व खेळाडूंना ए, बी आणि सी अशा तीन श्रेणीत विभागण्यात आले आहे. ज्यात खेळाडूंची मुळ किंमत वैयक्तिकरित्या क्रमशा दहा, आठ आणि सहा लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत तामिळनाडूतील इरोड, आंध्रप्रदेशातील विजयवाडा, हरयाणातील रोहतक, हिमाचल प्रदेशातील उना तसेच पुणे, दिलल, बंगळुरू आणि कोलकात्यात पार पडलेल्वया निवड चाचणीतून  जबरदस्त 180 खेळाडूंची निवड कबड्डीतल्या ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडूंनी केली आहे. या निवडीत देशभरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग आहे. ही पहिलीवहिली इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगला घराघरांत पोहोचविण्यासाठी या लीगच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी डिस्कवरी चॅनेलच्या परिवारातील डीव्ही स्पोर्टस् या क्रीडा वाहिनीने स्वीकारली आहे. लवकरच लीगच्या कार्यक्रमाची आणि लीगमध्ये खेळणाऱया संघांची आणि फ्रेंचाइजीझच्या नावांची घोषणा केली जाईल, अशी माहितीही प्रसाद बाबू यांनी पत्रकाद्वारे दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply