Breaking News

न्हावा शेवा वाहतूक शाखेतर्फे जेएनपीटी चेअरमन यांना निवेदन

उरण : वार्ताहर

कोरोना (कोविड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांना न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशात व महाराष्ट्र, मुंबईसह कोरोना हा संसर्गजन्य प्रसारीत झाल्याने व त्याची लागण बाहेरील देशातील येणारा बाधित व्यक्ती व इतर लोकांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींना होणारा हा रोग असल्याने आपण घ्यावयाची दक्षता, काळजी या करिता मुख्यमंत्री महाराष्ट्र व आरोग्यमंत्री, तसेच पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आदेशाने आपल्या पोर्टमध्ये येणारी बाहेरील देशातील व्हेसल (जहाज) त्यावरील कंटेनर हे पोर्टमध्ये उतरवुन घेऊन ते तात्काळ बाहेर पाठवू नयेत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. असेच व्हेसलवरील कॅप्टन, पॅसेंजर आणि वर्कर (नोकरदार) यांना पोर्ट बाहेर पाठवू नये. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी सूचना दिल्या आहेत. कोरोना हा संसर्ग जन्य रोग जंतू हा देशात पसरल्यामुळे आपण आपण आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी, स्टाफ यांना एकत्र न येण्याच्या सूचना द्याव्यात तरी कोरोना हा संसर्गजन्य जंतू प्रसारित होऊ नये या करिता आपण 31 मार्च 2020 किंवा पुढील आदेशापर्यंत आपण सहकार्य करावे अशी आपणास विनंती आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply