पाली ः प्रतिनिधी
पाली ग्रामपंचायत व येथील सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन रविवारपासून (दि. 22) सलग तीन-चार दिवस शहरातील विविध भागांत जंतुनाशक फवारणी केली. कोरोनाचे वाढते संकट पाहता इतर कोणत्याही जीवाणूंचा संसर्ग लोकांना होऊ नये यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे, अॅड. नरेश शिंदे, अमित निंबाळकर तसेच कर्मचारी अविनाश शिंदे, किरण पालकर व सुरज भगत यांच्यासह श्रीकांत ठोंबरे, सतीश शिंदे व गणेश सावंत या सुजाण नागरिकांनी पाली गावात मोटरसायकलवर फिरून व एकएकटे जाऊन ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी केली. परिसरातील डास व इतर जीवजंतू नष्ट व्हावेत आणि परिसर स्वच्छ व्हावा हा यामागील उद्देश होता. या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …