Breaking News

मी उरणकर जबाबदार उरणकर लघुपटाचे प्रदर्शन

उरण : वार्ताहर

उरण नगर परिषद वतीने उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील वाहतूक कोंडीवर जनजागृती करणे करिता उरण नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून अगदी कमी खर्चात अप्रतिम अशा सामाजिक संदेश देणार्‍या शॉर्ट फिल्म (लघु पट) मी उरणकर जबाबदार उरणकर या लघुपटाची निर्मिती केली आहे.या लघुपटाचा उद्देश हाच उद्देश आहे. मी उरणकर जवाबदार उरणकर या लघुपटाचे लेखक दिग्दर्शक विशाल गायकवाड आहेत. उरणच्या रस्त्यावर चित्रित झालेली वाहतूक कोंडी जनजागृतीपर चित्रित आधारित  मी उरणकर, जबाबदार उरणकर या शॉर्ट फिल्म (लघुपट) सिरीज निर्मिती केली आहे. या जनजागृती लघुपटाचे प्रदर्शन  बुधवार (दि. 19) रोजी तेरापंथ भवन येथे सायंकाळी येथे करण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, मुख्याधिकारी राहुल इंगळे, माजी नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, माजी नगरसेवक राजू ठाकूर, अभियंता झुंबर माने, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, उरण नगर परिषद लेखापाल सुरेश पोसतांडेल भाजप मंडळ अध्यक्ष हितेश शाह, सेक्रेटरी हस्तीमल मेहता, मनोहर सहतिया, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनीख् सचिन भानुसे, रचना सहायक, झुंबर माने आदी उपस्थित होते. आभार लेखापाल सुरेश पोस तांडेल यांनी मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply