Breaking News

एलईडी टीव्ही व पीसी प्रोजेक्टर चोरणारे गजाआड

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे महाराष्ट्र शासन शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये टीव्ही व प्रोजेक्टरचे वाटप केले होते. त्यातील 41 इंची फिलीप्स कंपनीचा एलईडी टीव्ही व डेल कंपनीचा पीसी प्रोजेक्टर चोरणार्‍या दोघा जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने गजाआड केले आहे.

याबाबत हारिग्राम गावातील शाळेच्या मुख्याध्यापिकारेश्मा पाटील यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बी. जी. शेखर पाटील, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, सहाय्यक फौजदार पाटील, पोलीस हवालदार साळुंखे, पाटील, गडगे, पवार, तरकासे, वाघ, सुर्यवंशी, पोलीस नाईक कुदळे, म्हात्रे, पाटील, कानू, मोरे, पोलीस शिपाई भोपी आदींच्या पथकाने शोध घेत केला.

या वेळी तपासादरम्यान पोलीस शिपाई प्रवीण भोपी याला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानुसार आरोपी रोशन म्हात्रे (27) व विनय जोशी (22) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल हस्तगत करण्यात आला आहे.

Check Also

अटल सेतूजवळ ‌‘शिवमुद्रा‌’ आणि ‌‘शिवस्मारक‌’ उभारणार; मंत्री आशिष शेलारांसमवेत आमदार महेश बालदींची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या अटल सेतूजवळ रायगडच्या दिशेला असलेल्या एका मोठ्या खडकावर भव्य …

Leave a Reply