Breaking News

भाजी खरेदी-विक्रीसाठी उरणमध्ये ठिकाणे निश्चित

उरण : वार्ताहर – उरणच्या जनतेची अडचण लक्षात घेऊन भाजी विकत घेण्यासाठी जनतेला उरणमधील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

यामध्ये 1) वीर सावरकर (लाल) मैदान, 2) सेंट मेरी मैदान पेडणेकर ज्वेलर्स समोर, 3) एनआय हायस्कूलचे मैदान, 4) पेन्शनर्स पार्क मराठी शाळेचे मैदान ह्या ठिकाणीच शुक्रवारपासून उरणातील होलसेल व रिटेल विक्रेते (रस्त्यावर न बसता) हे भाजीविक्री करण्यासाठी उरणच्या जनतेला उपलब्ध असणार आहेत.

जनतेने इतरत्र न जाता आपल्याला घरापासून जो परिसरजवळ पडेल तेथून भाजी विकत घ्यावी हि विनंती. ज्याची दुकाने आहेत ते दुकानात विकणार आहेत ह्याची नोंद घ्यावी, असे आवाहन उरण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या बाजाराची सुरुवात शुक्रवारपासूनच करण्यात आली. नागरिकांनी वीर सावरकर मैदान येथे भाजी खरेदीसाठी रांगेत उभे राहुन भाजी खरेदी केली. या ठिकाणी नगरपरिषद व पोलीस ठाण्याचे अधिकारी लक्ष देत होते. तसेच वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्याचे काम करीत होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply