Breaking News

लग्नसराईचे नियोजन बिघडले

उरण : रामप्रहर वृत्त

मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वच ठिकाणी लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुडा यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोना ब्रेक लागला आहे. लॉकडाऊनमुळे पूर्वनियोजित लग्नसमारंभ आणि साखरपुडा समारंभाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. काही लोकांना हे समारंभ पुढे ढकलले आहेत तर काहीजण पाच ते सहा नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकून घेत आहेत.  इतरवेळी भरघोस खरेदी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत साजरे होणारे हे समारंभ थंड पडले आहेत. सरकार कडून अशा समारंभासाठी पाच ते सहा लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली असल्याने काही लोकांनी समारंभ रद्द करण्याचे किंवा पुढे ढकलणेच पसंद केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी हेल्पलाइन

उरण : वार्ताहर

आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुले अचानक आजारी पडली तर दुचाकी  किंवा चारचाकी घेऊन बाहेर गेलात आणि पोलिसांनी चौकशीसाठी थांबविले तर घाबरुन न जाता आपण ज्या तालुक्यात राहतो त्या तहसीलदारांशी संपर्क साधावा. त्यांना आपल्या घरातील परिस्थिती सांगा. पोलीस, आरोग्य खाते यांच्याकडून त्वरीत मदत होईल. यासाठी तालुकानिहाय तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक 02141-222118, मो. 9763646326, निवासी नायब तहसीलदार अलिबाग 02141-222054, पेण 02143-252036, मुरुड 02144-274026, पनवेल 022-27452399, उरण 022-27222352, कर्जत 02148-222037, खालापूर  02192-275048, माणगाव 02140-262632, तळा 04140-269317, रोहा 02194-233222 पाली, 02142-242665, महाड 02145-222142, पोलादपूर 02191 240026, म्हसळा 02149-232224, श्रीवर्धन 02147-222226.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply