Breaking News

झाडे लावा झाडे जगवा…

खारघर शहरात वृक्षलागवड मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर शहरातील सेक्टर 1 कोपरा खाडी परिसरात के. बी. फार्म नर्सरी या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली. नारळासह विविध झाडांची लागवड करण्यात आली. विलास कान्हा भोईर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नगरसेविका अनिता वासुदेव पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक गुरुनाथ गायकर, कान्हा भोईर, बाबुरावशेठ भोईर, दत्तात्रेय वर्तेकर, किरण पाटील, संतोष तांबोळी, नरेश तोडेकर, अनिल पाटील, मनेश पाटील, रतन भोईर, विकी गायकर, साईनाथ तोडेकर, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर पवार, राजेश गोटीराम तोडेकर, महेश पाटील, विजय भोईर, संजय तोडेकर, रंजीत ठाकूर, नयन वर्तेकर, सचिन पवार, राज भोईर, मृणाल कोळी, मिथुन कोळी, निरंत भोईर, रोहन तोडेकर आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, कोपरा ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply