Breaking News

लॉकडाऊनमध्ये फिट राहा!

पंतप्रधान मोदींनी शेअर केली योगासने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना लॉकडाऊनच्या या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी फिटनेससाठी काय करतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी सोमवारी (दि. 29) दिले. त्यांनी योगासने करतानाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.  
मन की बात कार्यक्रमात एका व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांना फिटनेसबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ लायब्ररीची एक लिंक शेअर केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे योगासनांचे हे अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ सन 2018मधील आहेत.
‘मी योगासनांचे व्हिडिओ शेअर करतोय. तुम्हीही रोज कराल ही अपेक्षा,’ असे मोदींनी म्हटलेय.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply