Breaking News

कोरोनाबाबत चिमुकलीच्या पोलिसांना सूचना

कर्जत ः बातमीदार

कोरोनामुळे जागतिक संकट ओढवले आहे. अशा वेळी पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबापासून लांब राहून जनतेचे रक्षण करतात. त्या वेळी पोलिसांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत कर्जत येथील नऊ वर्षांच्या चिमुरडीने आपल्या हस्ताक्षराने रायगड जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या. त्याच वेळी पोलीस करीत असलेल्या कार्याला आपण सर्वांनी घरात राहून सहकार्य करू या, अशी भावना तिने पत्रातून व्यक्त केली आहे.

कर्जत महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या दक्षता समिती सदस्या मीना प्रभावळकर यांची नात इयत्ता चौथीमध्ये शिक्षत आहे. नऊ वर्षांच्या दुर्वाने 28 मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना पत्र लिहून पोलीस खात्याला सलाम केला आहे.

हे पत्र कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अनिल पारस्कर यांच्याकडे सादर केले. पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी दुर्वाच्या कर्जत येथील निवासस्थानी जाऊन तिला गुलाबपुष्प आणि एक पुस्तक भेट देऊन कौतुक केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply