हातावर पोट असणार्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नगरसेविका वृषाली वाघमारे यांची बांधिलकी
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी संचारबंदी संपूर्ण देशात लागू केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जी लोक रेल्वे स्टेशन, बसस्टॉप या ठिकाणी अडकलेली आहेत अशा लोकांना नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या सहकार्याने जय बजरंग मित्र मंडळ आणि पत्रकार मयुर तांबडे यांनी जेवण, पाणी व बिस्किटांचे वाटप केले.
या वेळी अॅड. जितेंद्र वाघमारे, जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, योगेश हांडगे, पटोले, पोलीस निरीक्षक वृषाली कावनपुरे हेही उपस्थित होते. येथील सर्व अडकलेल्या लोकांना पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन वेळेच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे, त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, त्याचप्रमाणे सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
भाजपच्या उलवे नोड कार्यालयातही उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त – नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने गोरगरीब, गरजूंना खाद्यपदार्थ व पाण्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या उलवे नोड येथील कार्यालय बामणडोंगरी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हा चिटणीस साईचरण म्हात्रे, उपसरपंच अमर म्हात्रे, राज्य उपाध्यक्ष निर्गुण कवळे, उत्तर भारतीय विभागाचे आदेश सिंग उपस्थित होते.
महेश कडू यांची आदिवासींना मदत
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन, संचारबंदीमुळे डोंगर कपारीत राहणार्या आदिवासी कुटुंबियांना हाल सहन करावे लागत असल्याचे निदर्शनास येताच उरण तालुक्यातील सोनारी गावाचे भाजप महालन विभाग अध्यक्ष तथा सोनारी ग्रामपंचायत माजी सरपंच महेश कडू यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी वाड्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यामध्ये पनवेल तालुक्यातील शिरढोण आदिवासी वाडी, उरण तालुक्यातील केल्यांनी आदिवासी वाडी, विंधणे आदिवासीं वाडी येथे सोमवारी (दि. 30) आपल्या सहकार्यांसमवेत जाऊन सुमारे 300 आदिवासी बांधवांना तांदुळ, साखर, मुगडाळ, चणाडाळ, चहापावडर, हळद, मसाला, पावडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. असून त्यांनी महेश कडू व सहकार्यांचे आभार मानले.
या वेळी भाजप महालन विभाग अध्यक्ष तथा सोनारी ग्रामपंचायत माजी सरपंच महेश कडू, सोनारी ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष दिनेश रमण तांडेल, सोनारी ग्रामपंचायत सदस्य जगदीश म्हात्रे, सदस्य जितेश कडू, चंद्रकांत कडू, आनंद कडू, किशोर कडू, मनोज कडू, महेश म्हात्रे, सुनील कडू, भरत कडू, राकेश कडू, प्रदीप कडू, धर्मेंद्र तांडेल आदी उपस्थित होते.
गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा होय कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांची उपासमार होत आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची वेळ आहे. आदिवासींना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे असे महेश कडू यांनी सांगितले. त्याच प्रमाणेसोनारी गावातील ग्रामस्थ, कंटेनर ड्राईव्हर व क्लिनर यांना सुमारे चार हजार मास्क वाटप केले.