Breaking News

अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वाहनांना रायगडात बंदी

म्हसळा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, पण त्यानंतरही रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही. परिणामी आता रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍यांना यातून मुभा आहे, तर अतिमहत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पास दिले जाणार आहेत. त्यासाठी र्लेींळव19.ाहिेश्रळलश.ळप या वेबसाइटवर नागरिकांनी संबंधित तपशील भरावयाचा आहे. याबाबतची माहिती म्हसळा पोलीस स्टेशनचे सपोनि. धनंजय पोरे यांनी दिली.

पास मिळवायला होणारी गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस ऑनलाइन सेवा देणार आहे. कोरोनाची भीती असताना अत्यावश्यक सेवांसाठी जिल्हा प्रशासनाकडून पास देण्यात येत होते. या पासद्वारे अत्यावश्यक सेवेच्या मालाची वाहने, मेडिकल सेवेतील व्यक्तीसह अनेक जणांना बंदीच्या काळातही प्रवास करता येत होता, मात्र हे पास काढण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली आणि यामुळे धोकाही वाढला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दलाने एकत्र येऊन ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी http:// covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करा आणि त्याद्वारे आवश्यक माहिती भरून दिल्यानंतर टठ लेवश उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा लेवश दाखवल्यानंतर वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

यामध्ये एकाही कागदाची, प्रत्यक्ष येऊन भेटण्याची गरज लागणार नाही. हा पास केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लागू होईल, असेही पोरे यांनी स्पष्ट केले. याशिवाय तालुक्यात किराणा मालासाठी घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा सामना करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो असून लोकांनी घरीच राहावे, असे आवाहन सपोनि. धनंजय पोरे यांनी केले आहे.

-अनधिकृत वाहतूक करणार्‍या पिकअपवर गुन्हा

अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी करण्यात आली असतानाही पोलादपूरवरून श्रीवर्धनकडे तंबाखू घेऊन जाणार्‍या एका पिकअपवर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस देवीदास कारखेले यांनी गुन्हा रजि 9/ 2020 भा. दं. वि. 188/271. कोविड 19/ उपाययोजना नियम 2020 नियम 11प्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे गुन्हा नोंदविला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply