Breaking News

उरणमध्ये महामार्गावर वाहनांना बंदी

उरण : प्रतिनिधी – कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वच महामार्गावरील वाहने अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त थांबविण्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनीही 21 दिवसांचा लॉकडाऊन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरनेर-खारपाडा महामार्गावर चिरनेर हायस्कूलच्या ठिकाणाजवळ  नाकेबंदी करण्यात येत असून, कोकण, गोव्याकडे जाणार्‍या प्रत्येक वाहनांला पुढील महामार्गावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

या शिवाय येणार्‍या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊनचे करण्यात आलेल्या आवाहनाला हरताळ फासण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे मनसुबे तयार करून लॉकडाऊन निमित्ताने वाहने बंदी करणार्‍या पोलिसांना थापा मारण्याचे प्रयत्न करीत असतांना अनेकजण दिसत आहेत. मात्र दोन दिवसांपासून महामार्गावरील वाहनांना चांगला ब्रेग लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे उत्तमप्रकारे लॉकडाऊन होत असून, रस्त्यावरील रोडरोमियोंनाही योग्यप्रकारे चाब लागला आहे.

उरण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. ए. हाशमी यांचे पोलीस पथक कोरोना संसर्गजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कर्तव्य बजावीत असून, मुंबई, ठाणे व नवीमुंबई येथील वाहने चिरनेर-खारपाडा महामार्गावरून रायगड जिल्ह्यासह कोकण व गोवा महामार्गावर जाण्यासाठी इंधन आणि वेळेची बचत होत असल्याने या महामार्गावर वाहनांची नियमित रेलचेल सुरूच असते मात्र या महामार्गावर 21 दिवसांच्या लॉकडाऊनसाठी वाहनांना बंदी केल्याने दोन-तीन दिवस शुकशुकाट झाल्याचे चित्र दिसत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply