Breaking News

खारघर अग्निशमन दलाचे आभार

खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रवीण काळूराम पाटील यांनी सिडको खारघर येथील अग्निशमन दल यांच्याकडे औषध फवारणीसाठी वैयक्तिक मागणी केली असता त्वरित त्या मागणीचा विचार करून पनवेल महानगरपालिका खारघर प्रभाग क्रमांक 4 मधील सेक्टर क्रमांक 21 या ठिकाणी औषध फवारणी करण्यास चालू करण्यात आली.

अशा तत्पर सेवेसाठी सदैव तयार असलेल्या सिडको अग्निशमन दल खारघर आणि कर्मचार्‍यांचे सभापती प्रवीण पाटील यांनी आभार मानले आहेत.

औषध फवारणी करताना सभापती प्रवीण पाटील, भाजपचे खारघर मंडल शहर अध्यक्ष ब्रिजेश पाटील, आरोग्य अधिकारी जितू माधवी, खारघर सिडकोचे अग्निशमन अधिकारी प्रविण बोडके, तसेच अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply