Breaking News

रोह्यातील कमानीला सी. डी. देशमुख यांचे नाव; नागरिकांच्या भावनांपुढे पालिका प्रशासन झुकले

धाटाव : प्रतिनिधी

रोह्याचे भूमिपूत्र व देशाचे पहिले अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान व राजमुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने रोहा-कोलाड रस्त्यावरील कमानीला डॉ. चिंतामण देशमुख प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते. परंतु नगरपालिकेने हे फलक त्याच रात्री हटवले. मात्र या कमानीला एका दिवसाच्या आत डॉ. सी. डी. देशमुख  प्रवेशद्वार असे नाव द्यावे, अशी मागणी सुराज्य व राजमुद्रा यांनी  नगरपालिकेकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार नगरपालिकेने या कमानीचे डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख प्रवेशद्वार असे नामकरण केले. रोहा-कोलाड रस्त्यावरील कमानीवर गेली अनेक वर्षे राजकीय बॅनर लावण्यात येत होते परंतु एकदाही रोहा नगरपालिकेने हे बॅनर खाली उतरले नाहीत. परंतु या कमानीवर डॉ. चिंतामणराव देशमुख प्रवेशद्वार असा बॅनर लावताच नगरपालिका प्रशासनाने तो काढून टाकला. यात सामाजिक संघटनांनी लक्ष घातल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply