Breaking News

दिव्यांगांच्या अडीअडचणींचे निराकरण करणे प्रशासनाचे कर्तव्यच -प्रांताधिकारी अमित शेडगे

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वाटप

अलिबाग : जिमाका
दिव्यांग बांधव समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव तत्पर आहे, हे प्रशासनाचे कर्तव्यचं आहे, असे प्रतिपादन श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग अस्मिता कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग घटकासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा, प्रशासन दिव्यांग बांधवांच्या सोबत आहे, असे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी या वेळी सांगितले. प्रांताधिकारी अमित शेडगे म्हणाले की, श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रासाठी अलिबागला जावे लागत होते. डॉक्टरांच्या सहकार्याने आपण आपल्या बांधवांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्राचे वितरण करीत आहोत. दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकारण करण्याच्या हेतूने शासनाने विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रम तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तहसीलदार सचिन गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गौतम देसाई, डॉ. शुभम शेळके, डॉ. प्रतिभा फडतरे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष निलेश नाक्ती, भरत पवार, मुईद सरखोत, संतोष पारधी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

 

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply