Breaking News

पाण्याच्या टाकीत विषारी औषध मिसळले

मुरूडमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा

रेवदंडा ः प्रतिनिधी

मुरूडमधील निडी गावालगत साठवणूक केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या निडी गावालगत साठवणूक टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीतील पाणी पिण्यासाठी येथील स्थानिक वापरतात, तसेच गुराढोरांनासुध्दा या टाकीतीलच पाणी देतात. या टाकीत रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने विषारी औषध टाकून टाकीतील पाणी दूषित केले. याबाबत निडी गावचे पोलीस पाटील नितेश पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. यानुसार रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात भा. दं. वि. कलम 277, 284प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply