Breaking News

‘कोरोना चाचणीचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असावे’

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लॅबकडून चाचणी करून दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका  चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारणार आहे. खासगी रुग्णालयांकडून कमी दर आकारणी होत असल्याने पालिकेच्या या शुल्क आकारणीस विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईत कोरोनासाठी सध्या एकही सरकारी संस्था नसल्याने मुंबईतील कस्तुरबा रुग्णाल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यात नवी मुंबईत कोरोना बधितांचा आकडा वाढत असल्याने नवी मुंबईकर चिंताग्रस्त आहेत. त्यात कोरोना या विषाणूची चाचणी रक्ताद्वारे न करता ती घशातील थुंकीतून केली जाते. अनेक विविध प्रकारच्या चाचण्या यात केल्या जातात. सध्या नवी मुंबईकरांना अत्यावश्यकता भासत असल्याने तसेच नवी मुंबई पालिकेकडे सातत्याने कोरोना चाचणीविषयी मागणी वाढत चालल्याने पालिकेने खासगी लॅबच्या सहकार्याने ही तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी चार हजार 500 रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. पालिकेने दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यास घरपोच लॅबचे कर्मचारी येऊन ही तपासणी करणार आहेत. पालिकेने अत्यावश्यक सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी सध्या या लॅबच्या तपासणी शुल्कासाठी पालिकेवर टीका होऊ लागली आहे. पालिकेने ही सुविधा मोफतकरावी अथवा कमी शुल्कात करावी, अशी मागणी वाढू लागली आहे. अनेक नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अनेक नोकरदारांना पगार मिळेल की नाही याची चिंता आहे. त्यामुळे पालिकेने चार हजार 500 शुल्कात काहीशी कपात करून ती सर्व सामन्यांना परवडेल अशा शुल्कात करून द्यावी, अशी मागणी वाढू  लागली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसची चाचणी मोफत करण्यात यावी. सर्वसाधारण नागरिकांना चार हजार 500 हे शुल्क परवडणारे नाही. त्यात नवी मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयासारखी सरकारी सेवा नसल्यामुळे लोकांना या आजाराच्या उपचारासाठी किंवा तपासणीसाठी कुठे जावे याबद्दल माहिती मिळत नाही. ही चाचणी सुरू करून पालिकेने उत्तम कार्य केले आहे. मात्र तपासणी शुल्क कमी करण्याची गरज आहे.

-मंगल घरत,  जिल्हा सरचिटणीस, नवी मुंबई, भाजप

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply