Breaking News

कर्जतमध्ये स्प्रिंग्लर मशिनद्वारे जंतुनाशक फवारणी

कर्जत ः बातमीदार

कर्जत नगर परिषदेने संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा चंग बांधला आहे. कर्जत नगर परिषदेने शहरात कमी मनुष्यबळाने जंतुनाशक केमिकलची फवारणी करण्यासाठी तातडीने नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेली स्प्रिंग्लर मशिन उपलब्ध केली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील सर्व वॉर्डांत नवीन स्प्रिंग्लर मशिनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड ह्या जंतुनाशक केमिकलची फवारणी केली जाणार आहे. नगर परिषदेकडे असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीतून अरुंद रस्त्यावरून फवारणी करणे अशक्य असल्यामुळे नगर परिषदेने आपत्कालीन व्यवस्थेसाठी व सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यासाठी नवीन स्प्रिंग्लर मशिन तातडीने उपलब्ध केली आहे. शहरातील अनेक भागांत जंतुनाशक केमिकलची फवारणी झाली असून काही ठिकाणी फवारणी करण्याचे काम बाकी आहे. नगर परिषद नियोजनबद्ध पद्धतीने जंतुनाशक फवारणी व शहरातील स्वच्छता प्राधान्याने करीत आहे. नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. तरी शहरातील नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे. घरातच राहावे. गर्दी करू नये, असे आवाहन कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नागरिकांना केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply