Breaking News

हुमगाव – एक आदर्श गाव

कर्जत तालुक्यातील ही अशी ग्रामपंचायत आहे कि जिथे ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत नाही. गावकर्‍यांनी ठरविल्या प्रमाणे ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रत्येक घरातील एका सदस्याला गावकर्‍यांचे समस्या सोडविण्यासाठी संधी दिली जाते. त्यामुळे या गावात पंचवीस वर्षात निवडणुकीवरून एकदाही भांडण तंटे झाले नाही हि ख्याती आहे. केवळ समजुतिने सर्व पक्षीय सदस्य एकत्र मिळून ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. तसेच या गावाचा सत्कार सर्व स्तरातून झालेली तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या गावाचा या निर्णयाचा सर्व ग्रामपंचायतीने आदर्श घ्यावा. तसेच विशेष म्हणजे हुमगांव हे बार्शी या नावाने ओळखले जाते. 

25 मे 1993 ला ग्रामपंचायतीची विभागणी झाली. आठ गाव मिळून हि ग्रामपंचायत होती मात्र शासनाच्या आदेशानंतर हुमगांव ग्रुपग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्यानंतर 3 ऑगस्ट 1995 ते 2021 पर्यंत बिनविरोध निवडणूक झाले आहेत. हा निर्णय कै. गोविंद दामू बार्शी यांनी समस्त ग्रामस्थांच्या विचाराने घेतला. निवडणूक जवळ आले कि लाखो रुपये खर्च करून निवडणूक लढविणार त्यामध्ये जय-पराजय होणारच. पण पराजय झाल्यांनतर मनामध्ये धरून ठेवलेला राग काढणार, जाणूनबुजून कामात खो घालणार, कोणत्याही मुद्द्याने होणारे भांडण थांबले पाहिजे यासाठी गोविंद बार्शी यांनी सर्व ग्रामस्थांना बोलावून बैठक घेतली त्यामध्ये यापुढे निवडणूक घेतले जाणार नाही असे जाहीर केले. प्रत्येक घरातील एका कुटुंबाला ग्रामपंचायतीचा कारभार हाताळायला संधी दिली जाणार जेणे करून वादविवाद होणार नाही. आणि गावाचा विकास होईल. त्यांचा हा निर्णय सर्वाना पटला त्याप्रमाणे ग्रामस्थ मंडळींनी निर्णयाचे स्वागत केले. त्याप्रमाणे तब्बल पंचवीस वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत सर्वानुमते लागत आली. आणि येणार्‍या उत्पन्नातून ग्रामपंचायत गावाचा विकास केला जातो. अजूनपर्यंत अशा प्रकारे कामकाज सुरु आहे. त्यामुळे राज्यस्तरापासून या ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले आहे.

3 ऑगस्ट 1995 ला स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यावर पहिले सरपंच शिवाजी बार्शी हे सर्वानुमते झाले. त्यावेळेस गावातील मूलभूत समस्या असलेली पाणी योजना. प्रत्येक घरासमोर एक बोअरवेल, विहिरी बांधले. वीज, रस्ता केला. स्वच्छता योजना राबवून प्रश्न सोडविली. आणि पहिले बोअरवेल तत्कालीन आमदार देवेंद्र साटम  यांनी आदिवासींवाडीमध्ये मारली. तसेच तत्कालीन 1996 साली खासदार आदिकाराव शिरोडकर असतांना त्यांनी आपल्या खासदार फंडातून दोन लाख निधी पोस्टस्टन्ड, पंप हाऊस आणि दहा हजार क्षमतेची पाण्याची टाकी उभारली. आणि ते अद्यापपर्यंत हि योजना सुरु आहे. तसेच 1995 साली ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न चार हजार 658 रुपये होते त्यावर कामे नियोजन करून करत असे. वेळप्रसंगी विकासकामांसाठी ग्रामस्थ वर्गणी देत असे. त्यातून विकास कामे केली जात होती. हुमगावमध्ये नुकतेच झालेले बिनविरोध निवणूक झाले असून कुठेही प्रचार प्रसार न करता सदस्य होतात. निवणूक प्रसंगी सर्व ग्रामस्थांना बोलावून सर्वांच्या मताने एक घर एक सदस्य या युक्तीप्रमाणे उमेदवार जाहीर करून विजयी केला जातो. त्यामुळे एवढ्या वर्षात उमेदवारासाठी भांडण तंटे झाले नाही. याला सहकार्य तरुण मित्र मंडळ, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग करीत असतात. यामध्ये हिरु सोनावळे, तुळशीराम भुंडेरे, बबन बागडे, दिलीप भुंडेरे, शिवाजी बार्शी, माजी सरपंच श्रीराम ठोबरे, पोलीस पाटील बबन बार्शी,सुनील बागडे या सर्वांचे योगदान लाभले.

हुमगांव ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार

2000-2001 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक पंचवीस हजार रोख व प्रमाणपत्र, 2002-2003 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक पंचवीस हजार रोख व प्रमाणपत्र, 31 मे 2002 कुष्ठरोग निवारण समिती संचलित बळवंतराय मेहता पंचायत राज जागृती केंद्र शांतीवन नेरे पनवेल जिल्हा स्तरीय रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार अकरा हजार रुपये रोख  आणि स्मृतीचिन्ह, 2003-2004 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक-प्रमाणपत्र. 2004-2005 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कुटुंब नियोजनाचे उत्कृष्ट कामे केल्यामुळे जिल्हा स्तरीय आबासाहेब खेडकर स्मृती विशेष पुरस्कार वीस हजार रोख-प्रमाणपत्र, 2005-2005 रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचेकडून आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त, 2005-2006 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक-प्रमाणक, अंगणवाडी सावित्रीबाई फुले पुरस्कार पंधरा हजार रुपये रोख-प्रमाणपत्र, स्वच्छ प्राथमिक शाळा साने गुरुजी पुरस्कार दहा हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळा पुरस्कार पन्नास हाजरी रुपये रोख-प्रमाणपत्र,23 मार्च 2006 संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत निर्मल ग्राम पुरस्कार स्मुती चिन्ह-प्रमाणपत्र, भारताचे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दोन लाख रुपये बक्षीस, 2008 महाराष्ट्र शासन वनविभाग संत तुकाराम वनग्राम योजना अंतर्गत प्रथम क्रमांक पंचवीस हजार रोख व स्मृतिचिन्ह-प्रमाणपत्र, 2009महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजने अंतर्गत 100% तंटामुक्त गाव म्हणून बक्षीस रुपये एक लाख पंचवीस हजार व प्रमाणपत्र, 2016-2017 स्मार्टग्राम योजने अंतर्गत तालुका स्मार्टग्राम पुरस्कार दहा लाख रुपये व प्रमाणपत्र पालक मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार रूपते एक लाख रोख व प्रमाणपत्र, 2018-2019 कर्जत, जिल्हा परिषद गट पाथरजमधून पन्नास हजार रुपये व प्रमाणपत्र.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply