Tuesday , March 28 2023
Breaking News

‘तटकरेंना घराणेशाही व नाराजी भोवणार’

माणगाव : सलीम शेख

रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना घराणेशाही आणि नाराजी भोवणार असून,मतदार पुन्हा एकदा शिवसेना,भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच मताधिक्याने विजयी करतील असा दावा शिवसेना नेते अ‍ॅड राजीव साबळे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामप्रहरशी बोलताना साबळे म्हणाले की,  गीते हे  चारवेळा रत्नागिरी मतदारसंघातून व दोन वेळा रायगड मतदार संघातून निवडुण आले असून ते तीन वेळा केंद्राचे मंत्री झाले आहेत. हे भाग्य कोकणातील कोणत्याच नेत्याला लाभले नसून ते   सातव्यांदा खासदार होणारच असून रायगड मतदार संघातून ते आता सलग तिस-यांदा निवडूण येवून खासदारकीची हॅट्रीक साधणार असा मला विश्वास. आहे.   रायगड मतदार संघात भ्रष्टाचार विरुध्द सदाचार अशी  लढत आहे. गिते यांच्याच्यावर कोणताच भ्रष्टाचाराच डाग अथवा कलंक लागलेला नाही. त्यांच्यासमोरील उमेदवार तटकरेंवर भ्रश्टाचाराचे आरोप आहेत. गुगल सर्च केला तर  तटकरेंचा भ्रष्टाचारामध्ये अग्रक्रम येतो. आम्ही मंडळीनी अगदी गा्रमपंचायत स्तरापासून ते आमदारकी पर्यंतचा निधी वापरुन  मतदार संघाचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्हाला 32 रायगड मतदार संघात अपेक्षेपेक्षा चांगले वातावरण असून विरोधकांची हवाच निघून गेल्याने ते आता जंग जंग पछाडत आहेत.असेही साबळे यांनी नमुद केले.

राजीव साबळे पुढे म्हणाले उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची 17 एप्रिलला  माणगांवात सभा होणार आहे. जनतेचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे.  रायगडमध्ये सुनिल तटकरेंची घराणेशाही सुरु आहे. ही घराणेशाही सर्व रायगडची जनता पहात आहे. हीच घरणेशाही तटकरेंना असा आरोपही साबळे यांनी केला.

रायगड जिल्हयातील माणिकराव जगताप, मधुकर ठाकूर, रवि पाटील यांच्यासह अनेकांचा विष्वासघात तटकरेंनी केला आहे. माणीकरांवाच्या मुलीला महाड नगरपरिषद निवडणुकीत पाडण्यासाठी  तटकरेेंनी  भरपूर प्रयत्न केले. रायगड जिल्हयातील काँगे्रस संपविण्याचा डाव तटकरेंचा आहे. मागील निवडणुकीत तटकरेंच्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढून सभांमध्ये वाटणारे शेकाप आमदार जयंत पाटील  हे आज तटकरेंच्या सोबत आहेत. गेल्यावर्शी तटकरेंवर जोरदार व्यासपींठावरुन प्रहार करणारे मधुकर ठाकूर त्यांच्या सोबत आहेत.

तर विविध व्यासपीठावरुन माणीकराव जगताप तटकरेंवर आसूड ओढणारे आज त्यांच्या सोबत आहेत. या नेत्यांवर काय विश्वास ठेवायचा ही म्हणण्याची वेळ आली असल्याची आता मतदार संघात फिरत असताना जनताच म्हणत आहे.अशी टीकाही साबळे यांनी केली आहे.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply