Breaking News

ज्येष्ठांसाठी धोका कायम

नवी मुंबईत कोरोना मृतांमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी ज्येष्ठ नागरिकांचा धोका अद्याप टळलेला नाही. मार्चपासून आतापर्यंत तब्बल 5,556 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आतापर्यंत 486 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबळींमध्ये 53.23 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. तसेच 4,705 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेस कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मृत्युदर कमी करण्यातही यश येऊ लागले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना बसला असून अद्याप त्यांचा धोका टळलेला नाही. मृतांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ज्येष्ठांची आत्ताही काळजी घेणे आवश्यक आहे.

13 मार्चपासून आतापर्यंत नवी मुंबईमध्ये तब्बल 45,031 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये 5,556 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये 60 ते 70 वयोगटातील सर्वाधिक 3,736 रुग्ण आहेत. एकूण रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण 12.33 एवढे असले तरी मृत्यू होणार्‍यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण 53 टक्के आहे. शहरात एकूण 913 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये 486 ज्येष्ठ नागरिक आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रमाण अद्याप 84 टक्के आहे. यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी ज्येष्ठ नागरिकांची यापुढेही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनामुक्त

ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असला तरी अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोनावर मात करीत आहेत. आतापर्यंत 60 ते 70 वयोगटातील 3256 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 70 ते 80 वयोगटातील 1,167 जण बरे झाले आहेत. 80 ते 90 वर्षे वयोगटातील 246 व 90 ते 100 वर्षे वयोगटातील 36 जण बरे झाले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोनावर मात करीत आहेत. सहव्याधी असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply