Sunday , October 1 2023
Breaking News

यंगस्टार कुर्डुस मंडळाच्या वतीने सुधागडातील 40 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पाली : प्रतिनिधी

कुर्डुस येथील यंगस्टार सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या सौजन्याने नुकताच अडुळसे येथील प्राथमिक शाळेत सुधागड तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवान व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष अनंत सोमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती साक्षीताई दिघे, पंचायत समिती सदस्या सविताताई हंबीर, सरपंच सोनल ठकोरे, विस्तार अधिकारी अरुणादेवी मोरे, केंद्रप्रमुख, शिक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडीताई, उपसरपंच व ग्रामसेविका आदी 40 कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संदिपा कोकाटे व ज्योती तुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी, केंद्रप्रमुख अलका फोंडे, मुख्याध्यापक संजय थळे, उपशिक्षक बाबुराव घुले, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे योगदान लाभले.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply