रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील एक गतिमंद मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या सात नराधमांना पोलिसांनी अटक केली. सातही जणांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावात पीडित गतिमंद मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. याच परिसरात राहणार्या सात जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीची तब्येत
बिघडल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले. वैद्यकीय तपासणीत ही मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या मुलीवर तिच्या परिसरातील सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम 376, 376, (2), (1), (एन), 376 (डी), 377 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अलिबाग न्यायालयाच्या आदेशानुसार या सात जणांची 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून, या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम करीत आहेत.
Check Also
‘सामना’ पन्नाशीचा झाला…
काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …